पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

जागतिक महिला दिवसाबद्दल मराठी अभिनेत्रींची मते

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ११ मार्च २०१७

जागतिक महिला दिवसाबद्दल मराठी अभिनेत्रींची मते | Marathi Actresses Opinion on Womens Day - Page 7

मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेणे काळाची गरज
आजच्या काळात महिला सुरक्षा हा एक अतिशय संवेदनशील विषय असल्यामुळे त्याकडे सगळ्यांनीच गांभीर्याने बघण्याची खूप गरज आहे. अल्पवयीन मुलीवर होत असलेल्या बलात्काराच्या बातम्या ऐकल्या तर मन हेलावून जाते. माझ्या आगामी ‘ती आणि इतर’ या सिनेमात देखील ही वास्तविकता दर्शविण्यात आली आहे. कुठे अत्याचार होताना दिसत असेल तर आपण त्यावर बोलायला हवे. लहानपणापासूनच शाळांमध्ये बाकी विषयांप्रमाणे मुलींना स्वसंरक्षणाचे धडे चालू केल्यास त्याचा खूप फायदा होऊ शकतो. एवढेच नाही तर शारीरिक शक्ती सोबत मानसिक बळही खूप महत्वाचे असते. त्यामुळे योगा,ध्यान ह्या गोष्टी मुलींना जर लहानपणापासूनच शिकवण्यात आल्या तर त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. त्याचप्रमाणे लहानपणापासूनच मुलगी म्हणेज असुरक्षित, कमजोर, प्रतिकार न करू शकणारी असे सगळे विचार मुलींच्या मनात बिंबवणे कुठेतरी थांबले पहिजे. म्हणूनच जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने मी सगळ्या महिलांना हेच सांगू इच्छिते, खंबीर बना, स्वत:च्या स्वसंरक्षणाकडे दुर्लक्ष करू नका आणि नेहमी सावधान रहा.प्रिया मराठे (अभिनेत्री)

Book Home in Konkan