MarathiMati.com - Official WhatsApp Number

जागतिक महिला दिवसाबद्दल मराठी अभिनेत्रींची मते

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ११ मार्च २०१७

जागतिक महिला दिवसाबद्दल मराठी अभिनेत्रींची मते | Marathi Actresses Opinion on Womens Day - Page 6

संस्कारातूनच समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन तयार होतो
पुरुषामागे स्त्रीचा हात असतो असे नेहमीच म्हटले जाते आणि ते खरे देखील आहे. त्यामुळे स्त्रीचे महत्व खूप मोठे आहे. मात्र, आपल्या इथे विविध कारणांमुळे तिला पुरुषांपेक्षा कमी लेखले जाते, तिच्यावर बंधने लादली जातात. तिच्या कपड्यावरून, वागण्या - बोलण्यावरून दुषणे ठेवली जातात. हे चुकीचे असून, तिच्यावर मर्यादा लादण्यापेक्षा समाजाची तिच्याकडे पाहण्याची वृत्ती बदलायला हवी. आज मुलीदेखील मुलांप्रमाणे घर चालवू शकतात, त्यामुळे प्रत्येक घराघरात होत असलेला भेदभाव थांबायला हवा. पालकांनी आपल्या पाल्यांना वाढवताना मुलगा किंवा मुलगी असा फरक करता कामा नये. कारण घरगुती संस्कारातूनच माणसाचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन तयार होत असतो, त्यामुळे लहानपणापासूनच स्त्री - पुरुष समानतेचे मूल्य मनात बिंबवणे महत्वाचे ठरेल. ‘कामयाबी ना लडका देखती हे ना लडकीया, कामयाबी सिर्फ सोच देखती हे’ असा संदेश देणारी अमीर खानची जाहिरात सगळीकडे झळकत आहे. ही जाहिरात समाजात काही सकारात्मक बदल घडून आणण्यास महत्वाची ठरेल, अशी मी आशा करते.रीना अगरवाल (अभिनेत्री)

Book Home in Konkan