MarathiMati.com - Official WhatsApp Number

जागतिक महिला दिवसाबद्दल मराठी अभिनेत्रींची मते

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ११ मार्च २०१७

जागतिक महिला दिवसाबद्दल मराठी अभिनेत्रींची मते | Marathi Actresses Opinion on Womens Day - Page 4

महिला दिवस तमाम ‘गृहिणी’ साठी खास असायला हवा.
मी २१ व्या शतकातील स्त्री असून माझी विचार करण्याची पद्धत आधुनिक आहे. आज महिलांनी चाकोरीबद्ध विश्वातून आपले अंग काढले आहे, अनेकांनी यशाची शिखर देखील गाठली आहेत. महिला दिवसाच्या निमित्ताने या सर्व यशस्वी महिलांचे मी अभिनंदन करते. पण कितीही उंचीवर जा पण पाय जमिनीवरच ठेवा, असा सल्ला मी माझ्या मैत्रिणींना देईल. आपली प्रगती आपल्या सभोवताली असणार्‍या हितचिंतकांमुळे आणि आप्तेष्टांमुळे होत असते, त्यामुळे त्यांना डावलून कसे चालेल. तसेच पुरुषांनी देखील आपल्या बायकोला तसेच नात्यांतील कोणत्याही स्त्रीला समान दर्जा द्यायला हवा. कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी फक्त स्त्रीची नाही आहे, पुरुषांची देखील तेवढीच आहे. संसाराचा गाढा दोन्ही चाकेवर समान चालायला हवा, माझ्या आगामी ‘ट्रकभर स्वप्न’ या कौटुंबिक सिनेमात अशीच एक सामान्य स्त्रीची कथा आहे. जी भारतातील प्रत्येक घराघरात असलेल्या एका सामान्य स्त्रीचे प्रतिनिधीत्व करते. यंदाचा महिला दिवस तमाम 'गृहिणी' साठी विशेष आणि खास असायला हवा.क्रांती रेडकर (अभिनेत्री)

Book Home in Konkan