जागतिक महिला दिवसाबद्दल मराठी अभिनेत्रींची मते

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ११ मार्च २०१७

जागतिक महिला दिवसाबद्दल मराठी अभिनेत्रींची मते | Marathi Actresses Opinion on Womens Day - Page 3

३६५ दिवस महिला दिवस असल्यासारखेच जगा
आजची स्त्री ही आधुनिक विचारांची आहे, चूल आणि मुल यासोबतच स्वतः च्या पायावर देखील ती उभी आहे. त्यामुळे स्वतःचा निर्णय स्वतः घेण्याची क्षमता तिच्याकडे आहे. आज मी माझ्या खाजगी आयुष्यात माझ्या कामाबरोबरच बायको, सून, आई आणि आजी अशा अनेक भूमिका बजावते आहे. अर्थात आजची प्रत्येक महिला ते करीत आहे. सध्या ती काळाची गरज देखील बनली आहे, अशावेळी नोकरी किंवा व्यवसाय करताना आपल्या प्राथमिक जबाबदारी देखील सांभाळता आली पाहिजे. आपले काम आणि जबाबदाऱ्या यातून सुवर्णमध्य आपल्यालाच काढायला हवा. नातेसंबंधांना न दुखावता आपले अस्तित्व देखील उभे करता येऊ शकते. आवड जोपासण्यासाठी वयाची बंधने लागत नाही, कोणत्याही वयात आपण काहीही शिकू शकतो. माझ्या ‘के दिल अभी भरा नही’ आणि ‘गोष्ट तशी गमतीची’ या दोन नाटकातील माझ्या भूमिका महिलांना हेच संदेश देतात. कौटुंबिक जबाबदार्‍या बरोबरच स्वतः कडे लक्ष द्या. तसेच केवळ एकदिवस महिला दिवस साजरा करण्यापेक्षा वर्षातील ३६५ दिवस महिला दिवस असल्या सारखेच जगा, आयुष्य सुंदर होईल.लीना भागवत (अभिनेत्री)