संदीप खरे यांच्या कविता आता तुमच्या मोबाईल फोन वर उपलब्ध

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ९ एप्रिल २०१६

संदीप खरे यांच्या कविता मोबाईल फोन वर | Sandeep Khare's Marathi Kavita App

संदीप खरेज वर्ल्ड !!

स्मार्ट्फोनच्या या जमान्यात, आपल्या रोजच्या आयुष्यात, वेगवेगळ्या बाबींच्या संदर्भात, मोबाईल apps ही गोष्ट आपल्या सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनली आहे.

नवीन तंत्रज्ञानाच्या या काळात जगभर पसरलेल्या सर्व रसिक मित्रांपर्यंत कवी संदीप खरे यांना त्यांच्या कविता सहजरीत्या पोहोचवता आल्या पाहिजेत असा उद्देश आहे. तसंच आपल्या आवडत्या कलाकाराची कला सहजरित्या अनुभवता येणं यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट चाहत्यांना नसते. हे करत असताना त्या कलाकाराच्या कामाची कदर करण्यासाठी, रसिक चाहत्यांनी अगदी थोडके पैसे खर्च करून त्याच्या कलेला दाद द्यावी असंही उद्दिष्ट मनाशी आहे. म्हणूनच संदीप खरे आणि Innovative Mobile Systems ह्यांनी एकत्रित रित्या एक नवीन app बनवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्या app चे नाव आहे “Sandeep Khare’s World” या App मध्ये कवितांची पार्श्वभूमी सांगत, त्यामागची विचारधारा समजावत, संदीप खरे त्यांच्या कविता आपल्याला हलकेच उलगडून दाखवतात. खास तुमच्यासाठी ह्या App मध्ये कवितेचे शब्द (Lyrics) देखिल सामावलेले आहेत. हे app विनामूल्य (free download) उपलब्ध आहे. त्यामधे संदीप खरे ह्यांच्या दोन कविता सस्नेह भेट म्हणून विनामूल्य उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सध्या एकच कवितासंग्रह सशुल्क (In-App Purchase) उपलब्ध आहे परंतु लवकरच आणखीही कवितासंग्रह उपलब्ध होणार आहेत.

खालील लिंक्स वापरून तुम्हाला हे अ‍ॅप आपल्या फोनवर इन्स्टॉल करून घेता येईल :

कवितांची पुस्तकं जरी उपलब्ध असली तरी नवीन काळाला अनुसरून डिजिटल माध्यमाद्वारे कविता कधीही ऐकण्याची ही सोय लोकांना आवडेल असा विश्वास आम्हाला वाटतो. हे माध्यम जरी काही जणांच्यासाठी नवीन असलं, तरी अशाप्रकारे online खरेदी हा अत्यंत सोयीचा प्रकार आहे. या app च्या निमित्ताने अनेक लोकांचं लक्ष जर या माध्यमाकडे वळलं तर रसिक प्रेक्षकांची जशी सोय होईल तसाच इतर नवोदित किंवा अनुभवी कलाकारांना हा मार्ग वापरणं सोयीचं जाईल.