मराठी दिनदर्शिका - शके १९३७ ची निर्मिती

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ एप्रिल २०१५

मराठी दिनदर्शिका - शके १९३७ ची निर्मिती | Marathi Dindarshika - Shake 1937 Launched

मराठी दिनदर्शिका - शके १९३७ ची निर्मिती - [Marathi Dindarshika - Shake 1937 Launched]

गुढी पाडव्याचा मुहुर्त साधून १९३७ स्टुडिओच्या आकांक्षा पगारे आणि मंगेश भायडे यांनी एका अस्सल मराठमोळ्या दिनदर्शिकेची निर्मिती केली आहे, ‘दिनदर्शिका - शके १९३७’.

खरंतर मराठी महिने, तारखा आपल्या व्यवहारात वापरल्या जात नाहीत आणि सण, एकादशी, चतुर्थी हे आपल्या पालकांकडूनच समजते. म्हणुन नुसती मराठी दिनदर्शिका करुन चालणार नाही हे लक्षात आल्याने व्यवहाराचा विचार करुन मराठी सोबतच इंग्रजी तारखांचा देखील समावेश या दिनदर्शिकेत करण्यात आलेला आहे.

Table Calendar स्वरुपातील या दिनदर्शिकेत कृष्ण धवल छायाचित्रांचा समावेश करण्यात आलेला आहे, दिनदर्शिकेतील शास्त्रोक्त माहितीसाठी सुप्रसिद्ध ‘कालनिर्णय’ आणि ‘दाते पंचांग’ ची संदर्भ म्हणून मदत घेण्यात आलेली आहे.

मर्यादित प्रतिंची छपाई केलेली ‘दिनदर्शिका - शके १९३७’ ही दिनदर्शिका विकत घेण्यासाठी ईच्छुक असल्यास आपण 1937studio@gmail.com येथे संपर्क साधु शकता.