MarathiMati.com - Android App on Google Play Store

एस. एन. डी. टी येथे आंतरराष्ट्रीय भूगोल परिषदेचे आयोजन

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ नोव्हेंबर २०१५

एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, पुणे येथे आंतरराष्ट्रीय भूगोल परिषदेचे आयोजन | IGU Conference at SNDT Women's University, Pune

एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, पुणे येथील भूगोल पदव्युत्तर विभागातर्फे ‘बदलत्या नागरी परिस्थितीतील भूपृष्ठ, पाणी, हवामान आणि आरोग्य विषयक स्थिती’ या विषयावर दिनांक ४, ५, ६ नोव्हेंबर २०१५ या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रस्तुत परिषदेमध्ये अमेरिका, भारत, इंग्लंड, रशिया, जपान, इस्त्राइल अशा विविध क्षेत्रातील २०० अभ्यासक - प्रतिनीधी सहभागी होणार आहेत. भूगोल, पर्यावरण क्षेत्र, औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि पाणी या घटकांशी संबंधित अभ्यासपूर्ण निबंध परिषदेमध्ये सादर होणार आहेत.

परिषदेचे उद्घाटन बुधवार दिनांक ४ नोव्हेंबर २०१५ रोजी सकाळी १० वाजता तारापोर सभागृह येथे मा. कुलगुरु डॉ. वसुधा कामत यांच्या अध्यक्षतेखाली व सुदूर संवेदन आणि उपग्रह प्रणाली यांचे तज्ञ्ज्ञ व अहमदाबाद येथील एस्त्रोच्या स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटरचे माजी संचालक मा. डॉ. प्रमोद काळे यांच्या हस्ते होणार आहे. चर्चासत्र ऎकण्यासाठी सर्वांना खुले आहे.

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store