Download MarathiMati.com's New Android App from Google Play

जर्मनीतही जल्लोशात साजरा झाला गणेशोत्सव

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ सप्टेंबर २०१६

जर्मनीतही जल्लोशात साजरा झाला गणेशोत्सव | Ganeshotsav 2016 Celebration at Marathi Mitra Mandal Germany

गणेशोत्सवाचा जल्लोष महाराष्ट्रासह भारतभर होत असतांना जर्मनीतील एर्लांगन (ERLANGEN) येथील महाराष्ट्रीय कुटुंबियांनी देखिल सलग दुसर्‍या वर्षी गणेशोत्सव साजरा केला आहे. जर्मनीमधील या कुटुंबियांनी ‘मराठी मित्र मंडळ फ्रान्केन, जर्मनी’असे मराठी मंडळच स्थापन केले आहे. महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातून आलेले हे कुटुंबीय वर्षभर मराठी पारंपारिक सण खुप उत्साहाने साजरे करतात.

उत्सव जासरा करतांना गणरायाची विधिवत आरत्या तर म्हंटल्या जाताच शिवाय स्त्रीया नऊवारी साडीत आणि पुरूष मंडळी भारतिय पोषाखातील लोकप्रिय असलेला कुर्ता घालुन अतिषय पारंपारिक पद्धतीने हा उत्सव साजरा करतात, यंदा मराठी कुटुंबियांसोबत तेथील जर्मन आणि रुसच्या कुटुंबियांचा उत्साह ही लक्षणीय होता. यामध्ये जळगावचे मिताली भागेश्वर, संतोष भागेश्वर, भुपेंद्र राणे, योगेश बोरणारकर आणि चव्हाण आदि कुटुंबियांनी सहभाग घेतला होता.

मुळचे वरणगांवचे (ता. भुसावळ) असलेले व जर्मनीमध्ये वास्तव्यास असलेले संतोष भागेश्वर यांनी ‘मराठीमाती डॉट कॉम’ ला दिलेल्या माहितीनुसार एर्लांगन येथे यापुर्वी कधीही असा मराठी उत्सव झाला नव्हता. सांस्कृतिक कार्यक्रमात गणेशवंदनेपासुन ते मंगळागौरीच्या खेळापर्यंत विविध प्रकारे कलाकारांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. चिमुकल्यांनीही ‘क्ले’(माती)चा गणपती बनवुन आणि पारंपारिक महाराष्ट्रीयन नृत्य सादर करुन कार्यक्रमामध्ये खुप उत्साहाने आपला सहभाग नोंदविला. सर्व कुटुंबियांनी मोदक व अस्सल महाराष्ट्रीयन भोजनाचा स्वाद घेतला. शेवटी गणेश विसर्जनाचा सोहळा लेझीम, नृत्य आणि भगव्या पताका नाचवत संपन्न झाला.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play