डॉ. मंदा-प्रकाश आमटे यांना मॅगसेसे पुरस्कार जाहीर
तीन दशकांपासून आदिवासींच्या सेवेत समर्पित असलेले सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी आमटे यांना अत्यंत प्रतिष्ठेचा ‘ रॅमन मॅगसेसे पुरस्कार ’ गुरुवारी जाहीर झाला. आमटे दाम्पत्यासह सातजणांची २००८ सालच्या मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड झाली आहे. |