मराठी कविता
All New marathi kavita, ghazals, charoli by marathi poets, Marathi Kavita Archive
कविता समजदार माणसाची
आता तुम्ही समजदार झाले असाल.
सर्व साधारण आयुष्यातील अनन्यसाधारण अडचणींवर मात केल्यामुळे आपला आत्मविश्वास प्रसरण पावला असेल.
सहाजिकच भुतकाळ म्हणजे काय हा प्रश्न? नव्याने निर्माण झालाही असेल एव्हाना - पण असो..
त्याचा काही उपयोग आहे का? आता..
एक बामण ढसाळलेला
`एक बामण ढसाळलेला' या शिर्षकावरून नामदेव ढसाळांच अनुकरण किंवा प्रभाव असली बेगडी भुल कोणा समीक्षकान माझ्या कवितेवर केली तर ते केवळ अन्यायीच नव्हे तर दोषास्पद ठरेल कारण `ढसाळ' नावाच्या कवीचा अंशात्मक ऋणबोजा उचलूनही मी माझी कविता स्वतंत्र आणि केवळ माझीच मानतो.
एका आईची अंतयात्रा..
आता सर्व काही आठवेल तुला
अगदी सर्व सर्व..
कदाचित रडशीलही
प्रेक्षकांच्या आग्रहास्तव..
एवढं कर
सूर्याच्या मांसल त्वचेवर दिवसांच्या सुया टोच
अंधाराची मेणबत्ती पेटव.
सगळी आत्मचरित्रे दोनदा वाच.





