॥ शब्दांनो या ॥
अनुभुतीच्या शब्दानो बिचकता का ?
शपत माझी ! माग माग फिरु नका
शब्दानो या माझ्यामागून दौडत या
डॉक्टरांची शपथ तुम्हाला
माग मुळीच पाहु नका
फुल्यांसारखे भंजक व्हा
डॉक्टरांसारखे वाहक व्हा
माझ्यासारखे कडक व्हा
आणि जमलच तर, ढसाळ, व्हायलाही दचकु नका !
कारण मानव्याच चांदण अजुन तरी बरसत नाही
म्हणुन म्हणतो उगाच घोळ घालु नका
संस्काराची नाळ तोडुन टाका
आवेगाने तुम्ही उठत चला
विद्रोहाने तुम्ही पेटत चला
करुणेन अश्रु ढाळीत चला
आणि जमलच तर चक्रधर व्हायलाही कचकु नका
कारण `मानव्याच चांदण' अजुन तरी बरसत नाही |