॥ माझ्या काळ्या आया ॥
ओरीसातील मुंडा काळ्या आयांनो तुमचं ते ऋण मी फेडणार आहे
रक्ताशी तुमच्या दुधाच नात साऱ्या जगाला ती सांगणार आहे
मराठी भताच गोरपान पोरट
सहज कस हो तुम्ही छातीशी धरलत
पिडीतांच ओझ झपाटून पेटता
रक्ताचा आठव ओळख पटवत
दुधाची आन मी भाकून सुनावता दावेदारांशी मी भांडणार आहे
रक्ताशी तुमच्या दुधाच नात साऱ्या जगाला मी सांगणार आहे
विटके पटकूर अंगाला बांधून
मुक्या लाजेला दरिद्री आवर
काळ्या कटीच्या वर नाही गेला
संस्कृतीच्या त्या वस्त्रांचा वावर.
दुधाची आण मी भाकून सुनावतो दावेदारांशी मी भांडणार आहे
रक्ताशी तुमच्या दुधाच नात साऱ्या जगाला मी सांगणार आहे. |