॥ निमित्त गुजरात दंगलीचे ॥
परवा एक गोरपान पोरगं भेटलं
फर्स्टक्लास स्कॉलर अर्थतच जाड भिंग
विद्वत्ता आणि प्रतिष्ठेचं झुल अंगावरच चढवित
सोपस्काराचा आव आणून निर्मळ हसल
गुजरात आंदोलनाच निमीत्त साधून
अन माझं `ब्रेनवॉशिंग' करायला लागलं
`सवलतींमुळे दंगल उसळली-आपलं मत?
नाही ती व्हायची होती म्हणूनच झाली'
तो स्तंभित - तरीही चाचपला
हक्कांची सनद जादा वाटली
म्हणूनच ती दंगल पेटली
पण ही जाळपोळ थांबणार कधी ?
`तुमच्याकडे पाहून थांबेल असं तुर्तांस तरी नाही'
मूळ प्रश्नाला तुम्ही बगल देताहात---- त्याची तक्रार
आपली ती जुनी खोड आहे हो ना !
आपला धर्म म्हणजे प्रचंड वटवृक्ष
उभ्या आडव्यांना कवेत घेणारा
अन दुःखितांचे अश्रू पिणारा -- हो ना ऽ
त्याने मान डोलावली -- मी गोळे मिटले
हात जोड-- म्हण! --- `सर्वेपि सुखीना सन्तु सर्वे------ |