॥ राणी, एवढं सांगून जा ॥
राणी, एवढं सांगून जा
मुडद्याच्या रांगेतला माझा मुडदा कोणता?
`मजनू' असतो तर ओळखलेच असते मला
राणी, तू किती क्रुर, निष्ठुर आणि दुष्ट
`लैला' झालीस ? मला `मजनू' न करताच?
अश्रुसंपात कितीही ओसंडू दे - उसळू दे
मी मात्र ओळखतो तू `लैला' नाही खास
ए, वेडे, सांग ना - अस का केलस?
बोहल्यावर चढतानाच माझा `मजनू' का केलास
मी मृताटलो - पूर्णावलो - मुडद्याला कसली ओळख
मरण्यापूर्वीच ` मजनू ' झालो असतो तर
आठवण तरी ताजी असती
पण मुडद्यावर कसला मजनु थोपतेस
तू लैला झालीस - होतीस - मजनूला न सांगताच ?
हे मुडद्याला कसे कळणार
काहीही म्हण मीच खरा `आरस्यानी दुर्दैवी केंद्र'
मजनूचं कलेवर व्हायलाही भाग्य लागत
म्हणून म्हणतो तू लैला नाही खास? |