क आद्याक्षरावरून मुलींची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६

क आद्याक्षरावरून मुलींची नावे | k Marathi Baby Girl names by initial

क आद्याक्षर - क आद्याक्षरावरून मुलींची नावे [k Marathi Baby Girl names by initial]

नावअर्थ
कनककांतालक्ष्मी, कमला
कनकप्रभासुवर्णासारखी प्रभा असलेली
कनकरेखासुवर्णरेखा
कनकलतासुवर्णवेल
कनकसुंदरीसुवर्णासारखी सुंदरी
कपर्दिनीपार्वती
कपिलापिंगट किंवा कुठल्याही एकाच रंगाची गाय
कर्पुरगौराकापरासारखी शुभ्र, कर्पुरा
कमलकमळ
कमलजा-
कमलनयनाकमळासारखे डोळे असलेली, कमलाक्षी
कमलिनीकमळाची वेल
करूणादया, दयाळू
कर्णिकाकर्णभूषण
कल्पनाआभास, तरंग
कल्पलताइच्छा पुरविणारी लता
कल्पिताकल्पना केलेली
कल्याणीशुभ, मंगल
कलाकौशल्याचे काम
कलापीकोकीळ
कलावतीकला जाणणारी
कलिकाकळी, पार्वती
कलिंदीयमुना
कवितापद्य
कशिदावस्त्रावरचे वेलबुट्टीचे काम
नावअर्थ
कस्तुरीएक अतिशय सुगंधी द्रव्य
कात्यायनीपार्वती, काली
कादंबरीसाहित्यकृती
कादंबिनीमेघमाला
कानन-
काननबालाअरण्यात राहणारी
कान्चीश्रीकृष्ण
कान्होपात्राएक स्त्री (दासी) संत
कामधेनूइच्छिलेली वस्तू देणारी गोमाता
कामनाइच्छा, कामिया
कामराजइच्छेप्रमाणे राज्य करणारा
कामाक्षीएक देवीविशेष
कामिनीसुंदरी
कावेरीएक नदी
काश्मिरी-
काशीएक पुण्यक्षेत्र
कांचनासोने
कांचनगौरीसोन्यासारखी गौरवर्ण
कांचनमालासोन्याची माळ
कांचनलतासोन्याची वेल
कांतापत्नी
कांतीतेज
कांतीदातेज देणारी
कांक्षाइच्छा
किन्नरीएक देवयोनी