मनाचे श्लोक - श्लोक ९९

प्रकाशन: संपादक मंडळ | २ मे २००८

मनाचे श्लोक - श्लोक ९९ | Manache Shlok - Shlok 99

मनाचे श्लोक - श्लोक ९९ - [Manache Shlok - Shlok 99] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ९९


जगीं धन्य वाराणसी पुण्यराशी ।
तयेमाजि आतां गतीं पूर्वजांसी ॥
मुखे रामनामावळी नित्य काळीं ।
जिवा हित सांगे सदा चंद्रमौळी ॥९९॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


जगत्यां तु वाराणसी पुण्यभूमि ।
र्मूता यत्र जीवा दिवं संप्रयांति ॥
मुखाच्चंद्रमौलेः समाकर्ण्य रामे ।
त्यतोऽयं स्फुटो रामचंद्रप्रभावः ॥९९॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात,
नामाचा महिमा जाणे शंकर ।
जना उपदेशी विश्वेश्वर ।
वाराणसी मुक्ति क्षेत्र ।
रामनामें करूनी ॥

रावण वधाच्या अंती, सर्व देवांनी श्रीरामाची स्तुति केली, तेव्हा स्तुति करताना भगवान शंकर म्हणाले,
अहं भगवन्नाम गृणन्कृतार्थो ।
वसामि काश्यामनिशं भवान्या ।
मुमूर्षमाणस्य विमुक्तयेऽहं ।
दिशामि मंत्रं तव राम नाम ॥ (अ.रामायण पु.स.१५-६२)