मनाचे श्लोक - श्लोक ९८

प्रकाशन: संपादक मंडळ | १ मे २००८

मनाचे श्लोक - श्लोक ९८ | Manache Shlok - Shlok 98

मनाचे श्लोक - श्लोक ९८ - [Manache Shlok - Shlok 98] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ९८


हरीनाम नेमस्त पाषाण तारी ।
बहु तारीले मानवी देहधारी ॥
तया रामनामीं सदा जो विकल्पी ।
वदेना कदा जीव तो पापरूपी ॥९८॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


स्फुटं तारिताः प्रस्तरा येन तोये ।
श्रमस्तस्य कस्तारणे मानवानाम्‌ ॥
तथाप्यस्य संकीर्तनेऽश्रद्दधानो ।
वदेद्यो न रामं सं पाम्या जनेषु ॥९८॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


नामाचा महिमा सांगताना श्रीसमर्थ म्हणतात,
नामें पाषाण तरले ।
असंख्यात भक्त उद्धरले ।
माहा पापी ते चि जाले ।
परम पवित्र ॥

धादांत पाषाण तरले, मग मानव देहधारी, पाषाण का होईनात, रामनामेंकरून तरील यात काय संशय उरला ?

पण असे असूनही, त्या रामनामाविषयी नेहमी साशंक होऊन जो कधीही नामस्मरण करीत नाही, तो पापी म्हटला पाहिजे.

सद्य प्रत्यय हि देखोनि ।
भक्ति नुपजे ज्याचें मनीं ।
तो चि पाषाण ये जनीं ।
नव्हे पाषाण पाषाण ॥