मनाचे श्लोक - श्लोक ९४

प्रकाशन: संपादक मंडळ | २७ एप्रिल २००८

मनाचे श्लोक - श्लोक ९४ | Manache Shlok - Shlok 94

मनाचे श्लोक - श्लोक ९४ - [Manache Shlok - Shlok 94] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ९४


तिन्ही लोक जाळुं शके कोप येतां ।
निवाला हरु तो मुखे नाम घेतां ॥
जपे आदरें पार्वती विश्वमाता ।
म्हणोनी म्हणा तेंचि हे नाम आतां ॥९४॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


त्रिलोकीविदाहे क्षमो योऽस्ति रुष्टः ।
स देवः शंभ प्राप यत्कीर्तनेन ॥
जपत्यादरात्पार्वती यत्सदैव ।
तदेवेह सर्वेर्जनैः कीर्तनीयम्‌ ॥९४॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात की, भगवान शंकर कोपले तर तिन्ही लोक जाळून त्यांचे भस्म करू शकतात. पण श्रीरामाच्या स्मरणामुळे ते शांत असतात. विश्वमाता पार्वतीदेवी सुद्धा अत्यंत आदराने श्रीरामाचे स्मरण करतात. म्हणूनच आपणही श्रीरामाचे अखंड स्मरणात लीन व्हावे.

सुरेंद्र चंद्रशेखरु । अखंड ध्यातसे हरु । जनासि सांगतो खुणा । श्री राम राम हें म्हणा ॥
महेश पार्वतीप्रती । विशेष गूज सांगती । सलाभ होतसे दुणा । श्री राम राम हें म्हणा ॥
विषें बहुत जाळिलें । विशेष आंग पोळिलें । प्रचीत माझिया मना । श्री राम राम हें म्हणा ॥
बहुत प्रेत्न पाहिले । परंतु सर्व राहिले । विबुधपक्षरक्षणा । श्री राम राम हें म्हणा ॥
अपाय होत चूकला । उपाय हा भला भला । नसे जयासि तूळणा । श्री राम राम हें म्हणा ॥
बहुत पाहिले खरें । परंतु दोनि आक्षरें । चुकेल येमयातना । श्री राम राम हे म्हणा ॥