Download MarathiMati.com's New Android App from Google Play

मनाचे श्लोक - श्लोक ९२

प्रकाशन: संपादक मंडळ | २५ एप्रिल २००८

मनाचे श्लोक - श्लोक ९२ | Manache Shlok - Shlok 92

मनाचे श्लोक - श्लोक ९२ - [Manache Shlok - Shlok 92] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ९२


अती आदरें सर्वही नामघोषे ।
गिरीकंदरी जाइजे दूरि दोषें ॥
हरी तिष्ठतू तोषला नामघोषें ।
विशेषें हरामानसीं रामपीसें ॥९२॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


हरेः कीर्तनं दीर्घघोषेण कार्य ।
समाश्रित्य कांतारमद्रेर्गुहां वा ॥
हरस्तिष्ठति स्वां समाकर्ण्य कीर्ति ।
मनःशांकरं रामपैशाचमाप ॥९२॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून नामसाधनेचे महत्त्व पटवून देताना सांगतात की, श्रीरघुवीराचा अती आदराने घोष केल्यास, घोष करणाऱ्यापासून सर्व दोष पळून गिरिकंदरी लपण्यास जातात. थोडक्यात, सर्व दोषच नाहीसे होतात.

नाम स्मरे निरंतर ।
तें जाणावें पुण्य शरीर ।
माहा दोषांचे गिरिवर ।
रामनामें नासती ॥

“नामतोषें तोशला हरी तिष्ठतु” असा अन्वय. नामस्मरणाच्या आनंदाने आनंदित झालेला असा परमेश्वर तिष्ठतु म्हणजे रहातो, जेथे नामस्मरण होत असेल तेथे आनंदाने रहातो, असा अर्थ.

नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ ।
मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ॥

नाहीं वैकुंठीचा ठाईं ।
नाहीं योगियांचा हृदई ।
माझे भक्त गाती ठाई ठाई ।
तेथें मी तिष्ठतु नारदा ॥

भगवान शंकरांच्याही अंतःकरणाला रामनामस्मरणाचे वेड आहे, असं समर्थ येथे सांगत आहेत.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play