मनाचे श्लोक - श्लोक ९१

प्रकाशन: संपादक मंडळ | २४ एप्रिल २००८

मनाचे श्लोक - श्लोक ९१ | Manache Shlok - Shlok 91

मनाचे श्लोक - श्लोक ९१ - [Manache Shlok - Shlok 91] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ९१


नको वीट मानूं रघुनायकाचा ।
अती आदरे बोलिजे राम वाचा ॥
न वेंचे मुखी सांपडे रे फुकाचा ।
करीं घोष त्या जानकीवल्लभाचा ॥९१॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


उदासीनता रामचंद्र न कार्या ।
मुदा कीर्तयेन्नाम तस्यैव नित्यम्‌ ॥
न किंचिद्रूययः कीर्तने रामनाम्न ।
स्ततो वर्णयेज्जानकीशस्य कीर्तिम्‌ ॥९१॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ मनाला समजवत आहेत की, श्रीरामनामस्मरणाचा कधीही वीट मानू नकोस. नामस्मरण केल्याने तुझे स्वतःचे काहीही खर्च होणार नाही.

जय जय रघुवीर समर्थ । असा घोष करावा. असा घोष केल्याने काय होईल ? याचे उत्तर पुढील श्लोकात आहे.