मनाचे श्लोक - श्लोक ८९

प्रकाशन: संपादक मंडळ | २२ एप्रिल २००८

मनाचे श्लोक - श्लोक ८९ | Manache Shlok - Shlok 89

मनाचे श्लोक - श्लोक ८९ - [Manache Shlok - Shlok 89] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ८९


जनीं भोजनी नाम वाचे वदावें ।
अती आदरे गद्यघोषे म्हणावे ॥
हरीचिंतने अन्न सेवीत जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ॥८९॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


सदा भोजनादौ वदेद्रामनाम ।
ततो भोजने दीर्घघोषण वाच्यम्‌ ॥
प्रतिग्रासमेवं वदेन्नम पुण्यं ।
तदा प्राप्यते श्रीहरिः सत्स्वभावात्‌ ॥८९॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून सांगत आहेत की,
चालतां बोलता धंदा करितां ।
खातां जेवितां सुखी होतां ।
नाना उपभोग भोगितां ।
नाम विसरों नये ॥
अखंड नामस्मरणाचा छंद लागावा म्हणजे, ज्याचे नाम आपण घेतो, तो श्रीराम पावल्यावाचून राहणार नाही.

गद्य घोषे म्हणजे गर्जना करून, मोठ्याने.