मनाचे श्लोक - श्लोक ८७

प्रकाशन: संपादक मंडळ | २० एप्रिल २००८

मनाचे श्लोक - श्लोक ८७ | Manache Shlok - Shlok 87

मनाचे श्लोक - श्लोक ८७ - [Manache Shlok - Shlok 87] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ८७


मुखी राम त्या काम बाधुं शकेना ।
गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना ॥
हरीभक्त तो शक्त कामास भारी ।
जगीं धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥८७॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मुखे यस्य रामो न कामोऽस्ति चित्ते ।
प्रकुष्टं भवेत्तस्य शिष्टत्वमुर्व्याम्‌ ॥
हरेर्भक्तियोन कामं विजित्याऽ ।
लभद्धन्यतां मारुतिर्ब्रह्मचारी ॥८७॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ अत्यंत विश्वासाने आपल्या सर्वांना सांगत आहेत की, अखंड नामस्मरण करणाऱ्याला कामाची बाधा होऊच शकत नाही.

श्रीसंत एकनाथ महाराज एकनाथी भागवतात असे म्हणतात की,
जो कोणी स्मरे माझें नामु ।
तिकडे पाहूं न शके कामु ॥ ए.भा.१२.१५५ ॥

श्रीरामाच्या गुणसंकीर्तनाच्या योगाने, साधकावर कितीही संकटे आली, तरीही तो डगमगत नाही.

विषई धावें वासना ।
परी तो कदा डळमळिना ।
ज्याचें धारिष्ट चळेना ।
तो सत्वगुण ॥

हरिभक्ती करणारा सामर्थ्यवान होय, त्याच्या पुढे कामाचे काहीही चालत नाही. तो कामाला जिंकतो.

पहिल्या तीन चरणात श्रीरामनामस्मरणाचा जो महिमा वर्णिला आहे, त्याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे महाबली श्रीहनुमान होय !