पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

मनाचे श्लोक - श्लोक ८६

प्रकाशन: संपादक मंडळ | १९ एप्रिल २००८

मनाचे श्लोक - श्लोक ८६ | Manache Shlok - Shlok 86

मनाचे श्लोक - श्लोक ८६ - [Manache Shlok - Shlok 86] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ८६


मुखी राम विश्राम तेथेचि आहे ।
सदानंद आनंद सेवोनि आहे ॥
तयावीण तो शीण संदेहकारी ।
निजधाम हे नाम शोकापहारी ॥८६॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मुखे यस्य रामः सुखं तस्य नित्यं ।
सदानंदरुपे निमग्नःस आस्ते ॥
विना राममन्यत्र खेदः श्रमश्र्च ।
सदा रामसंकीर्तनाच्छोकहानिः ॥८६॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात, श्रीराम, हाच योगेश्वरांचा विश्राम आहे. ज्यांनी श्रीरामाला कंठी धारण केला, त्यांनाच विश्राम मिळाला, शांतसुख मिळाले.

म्हणून मी म्हणतो, हे मना, तू अखंड नामस्मरण करीत नित्यानंदात निमग्न होऊन रहा.

श्रीरामावाचून, बाकी सर्व संशय उत्पन्न करणारा शीण आहे.

सांडून राम आनंदघन ।
ज्याचे मनी विषयचिंतन ।
त्यासी कैचे समाधान ।
लोलंगतासी ॥

श्रीरामाचे नाम, हेच शोक हरण करून विश्रांती देणारे आमचे धाम होय.

Book Home in Konkan