मनाचे श्लोक - श्लोक ८१

प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००८

मनाचे श्लोक - श्लोक ८१ | Manache Shlok - Shlok 81

मनाचे श्लोक - श्लोक ८१ - [Manache Shlok - Shlok 81] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ८१


मना मत्सरे नाम सांडूं नको हो ।
अती आदरे हा निजध्यास राहो ॥
समस्तांमधे नाम हे सार आहे ।
दुजी तूळणा तूळितांही न साहे ॥८१॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो मा त्यज श्रेष्ठरामस्य नाम ।
निदिध्यास एषोऽस्त्वतीवादरात्ते ॥
समस्तेषु नामस्विदं सारमेव ।
न चैतस्य तुल्यं किमप्यस्ति लोके ॥८१॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून सांगत आहेत की, हे मना, सत्पुरुषांविषयी मत्सरग्रस्त होऊन नामस्मरण सोडून देऊ नकोस.

नामस्मरणाचा छंद लागला म्हणजे, ज्या दैवताचे आपण नामस्मरण करतो, त्याचा निदिध्यास लागून त्यायोगे साधक साक्षात्कारी होतो.

सर्व साधनांमध्ये नामस्मरण हे श्रेष्ठ साधन होय.

कांही च न करूनि प्राणी ।
राम नाम जपें वाणी ।
तेणें संतुष्ट चक्रपाणी ।
भक्तांलागीं सांभाळी ॥

त्या नामस्मरणाची सर यज्ञ, याग, दान, तप, व्रत इत्यादि साधनांना येणार नाही.