मनाचे श्लोक - श्लोक ८

प्रकाशन: संपादक मंडळ | ८ फेब्रुवारी २००८

मनाचे श्लोक - श्लोक ८ | Manache Shlok - Shlok 8

मनाचे श्लोक - श्लोक ८ - [Manache Shlok - Shlok 8] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ८


देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी ।
मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे ।
परी अंतरीं सज्जना नीववावे ॥८॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो देहपातेsपि कीर्ति: स्थिरास्या ।
द्यया तां क्रियां सर्वदैवाssरभस्व ॥
मनश्र्वांदनं सहुणं संप्रगृह्य ।
त्वया सर्वथा सज्जना: संप्रतोष्या: ॥८॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


जन्माला आलेल्या जीवाला एक दिवस देवाज्ञा होणारच आहे, कारण देह हा नश्वर आहे. ऐसें जाणोनियां जीवें । याचें सार्थक ची करावें । जनीं मरोन उरवावें । कीर्तिरुपें ॥

मरोन कीर्ति उरवावी । नुरवावी अपकीर्ति ते । धन्य धन्य म्हणे लोक । सत्क्रिया करितां बरी ॥

चंदन झिजतो खरा, पण तो झिजतो तेव्हाच त्याचा सुगंध येतो. मी न झिजता लोकांनी माझा सुगंध घ्यावा, असे जर चंदन म्हणेल तर ते अयोग्यच ठरेल. तद्वत् हे मना, साधुसंतांच्या अंतःकरणाला जर तुला रिझवावयाचे असेल, तर तुला ही चंदना प्रमाणे झिजले पाहिजे. हे मना, तू झिज, पण सत्पुरुषांचा संतोष संपादन केल्यावाचून राहू नकोस.