MarathiMati.com - Android App on Google Play Store

मनाचे श्लोक - श्लोक ७९

प्रकाशन: संपादक मंडळ | १३ एप्रिल २००८

मनाचे श्लोक - श्लोक ७९ | Manache Shlok - Shlok 79

मनाचे श्लोक - श्लोक ७९ - [Manache Shlok - Shlok 79] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

श्लोक ७९


मना पावना भावना राघवाची ।
धरी अंतरीं सोडिं चिंता भवाची ॥
भवाची जिवा मानवा भूलि ठेली ।
नसे वस्तुचि धारणा व्यर्थ गेली ॥७९॥समर्थ रामदास स्वामी

संस्कृत रुपांतर


मनो भावनां रामचंद्रस्य पुणयां ।
निधयांऽसजांऽतर्जहि त्वं दुराशाम्‌ ॥
भवेद्विस्मृतिर्नैव तावद्रवस्य ।
ह्यसद्वस्तुसंधारणाऽस्तीह यावत्‌ ॥७९॥समर्थ रामदास स्वामी

अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून मनाला कळकळीने समजावून सांगत आहेत की, हे मना, तू प्रपंचाची जी सारखी चिंता करत असतोस, ती सोडून, त्याऐवजी तुला पावन करणारी श्रीरामाची भावना कर, श्रीरामाचा तुला सतत ध्यास लागू दे.

सांडून आपली संसारवेथा । करीत जावी देवाची चिंता ॥

परंतु तू हे सोडून संसाराचीच जास्त चिंता करत असतोस. एक सत्य नीट समजून घे, दिसणारा हा संसार, ही नुसती एक भूल आहे, भ्रम आहे.

येक परब्रह्म संचलें ।
कदापी नाहीं विकारलें ।
त्यावेगळें भासलें ।
ते भ्रमरूप ॥

त्यामुळे, अशा भ्रमरूप, मिथ्या संसाराची भावना व्यर्थ आहे.

नसत्या वस्तूंच्या ठायीं जाण ।
मी माझें हा अभिमान ।
तें चि मोहाचें लक्षण ।
ममता दारुण ते संधी ॥

सत्यस्वरूपाचा आनंद घे, मिथ्या मायेचा आधार सोड !

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store