मनाचे श्लोक - श्लोक ७८

प्रकाशन: संपादक मंडळ | १३ एप्रिल २००८

मनाचे श्लोक - श्लोक ७८ | Manache Shlok - Shlok 78

मनाचे श्लोक - श्लोक ७८ - [Manache Shlok - Shlok 78] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ७८


अहो ज्या नरा रामविश्वास नाहीं ।
तया पामरा बाधिजे सर्व कांही ॥
महाराज तो स्वामि कैवल्यदाता ।
वृथा वाहणें देहसंसारचिंता ॥७८॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


अहो यस्य रामे न विश्वस्तबुद्धि- ।
र्भवेत्पामरः सर्वदा दुःखभाक्सः ॥
शिरस्थेऽद्य कैवल्यदे रामचंद्रे ।
वृथा देहनिर्वाहचिंताल्पबुद्धेः ॥७८॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून स्पष्टच सांगतात की, ज्याची परमेश्वरावर निष्ठा नसते, अशा क्षुद्र मनुष्याला सर्व काही बाधते. त्याला कशाचेही सुख लाभत नाही, देहाची व संसाराची चिंता करण्यात तो चूर असतो. परंतु, सर्व कांही चिंता केली भगवंतानें । असा ज्याचा दृढ विश्वास असतो, त्याला सुखदुःखाची मुळीच पर्वा उरत नाही आणि असे होणे साहजिक आहे. मोक्षदाता प्रभु श्रीराम याने, आपला सर्व भार घेतला आहे, अशी प्रबळ निष्ठा असल्यावर काळजी कशाची उरणार ?

वसे अंतरी रामविश्वास जेथें ।
नसे मानसीं नष्ट संदेह तेथें ।
विवेकें अहंभाव ज्याचा गळाला ।
सदा राघवीं ऐक्यरूपें मिळाला ॥