मनाचे श्लोक - श्लोक ७५

प्रकाशन: संपादक मंडळ | १३ एप्रिल २००८

मनाचे श्लोक - श्लोक ७५ | Manache Shlok - Shlok 75

मनाचे श्लोक - श्लोक ७५ - [Manache Shlok - Shlok 75] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ७५


समस्तामधे सार साचार आहे ।
कळेना तरी सर्व शोधुन पाहे ॥
जिवा संशयो वाउगा तो त्यजावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७५॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनाः साधनेष्वेतदेव प्रशस्तं ।
न चेन्मन्यसे साधुभिर्निश्र्चिनु त्वम्‌ ॥
वृथा संशयस्त्याज्य एवांतकारी ।
प्रभाते हृदा राघवश्र्चिंतनीय ॥७५॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून बोध करवून देत आहेत की, सर्व उपायांमध्ये रामनाम, हे खरोखर सार आहे, सत्य आहे. ते कसे, हे समजत नसल्यास ग्रन्थग्रन्थांतरी शोध करून, विचार करून पहा म्हणजे कळेल. पण असे काहीच न करता, निरर्थक संशयाचे भरी भरण्याचे सोडून द्यावे. अहर्निशी श्रीरामाचे चिंतन करावे हे उत्तम.

रामदास म्हणे साराचे हि सार ।
सर्वांसी आधार भक्ती भाव ॥

भजनरहित ज्ञानें मोक्ष होणार नाहीं ।
सकळ निगम त्यांचे सार शोधूनि पांही ।
सगुण भजन मागें रक्षिलें थोर थोरी ।
अधम नर तयांचे ज्ञान संदेहकारी ॥