पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

मनाचे श्लोक - श्लोक ७३

प्रकाशन: संपादक मंडळ | ११ एप्रिल २००८

मनाचे श्लोक - श्लोक ७३ | Manache Shlok - Shlok 73

मनाचे श्लोक - श्लोक ७३ - [Manache Shlok - Shlok 73] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ७३


देहेदंडणेचे महादु:ख आहे ।
महादु:ख तें नाम घेता न राहे ॥
सदाशीव चिंतीतसे देवदेवा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७३॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


महद्दुःखमुत्पद्यते देहदंडा ।
त्सुदुःखक्षयो रामसंकीर्तनेन ॥
शिवश्र्चितयत्येव यं देवदेवं ।
प्रभाते हृदा राघवश्र्चिंतनीय ॥७३॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून आपल्या सर्वांना सांगत आहेत की, तीर्थयात्रा, व्रते, अनुष्ठाने इत्यादि जी साधने आहेत, त्यात शरीराला कष्ट आहेत. परंतु नामस्मरणात तसले कोणत्याही प्रकारचे कष्ट होत नाहीत.

राम हा देव देवांचा ।
देव प्रत्यक्ष सोडिले ।
गाजली गोष्टी वैकुंठी ।
माजली सचराचरी ॥

Book Home in Konkan