मनाचे श्लोक - श्लोक ७२

प्रकाशन: संपादक मंडळ | १० एप्रिल २००८

मनाचे श्लोक - श्लोक ७२ | Manache Shlok - Shlok 72

मनाचे श्लोक - श्लोक ७२ - [Manache Shlok - Shlok 72] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

श्लोक ७२


न वेचे कदा ग्रंथचि अर्थ काही ।
मुखे नाम उच्चारितां कष्ट नाहीं ॥
महाघोर संसारशत्रु जिणावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७२॥समर्थ रामदास स्वामी

संस्कृत रुपांतर


भवेन्न व्यः स्वीयवित्तस्य किंचि ।
त्तथोच्चारणे रामनान्मो न कष्टम्‌ ॥
क्षयो जायते येन संसारशत्रौः ।
प्रभाते हृदा राघवश्र्चिंतनीय ॥७२॥समर्थ रामदास स्वामी

अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून सांगत आहेत की, नामस्मरण हे साधन फार सोपे आहे. त्याला काही वेचावे लागत नाही, कष्टावे लागत नाही, काही उपकरणे किंवा सामुग्री लागत नाही.

पण हे साधन दिसायला जरी सोपे दिसले तरी त्याचे कार्य फार मोठे आहे. नामस्मरणापुढे संसाररूपी भयंकर शत्रूचे काही चालत नाही. अखंड नामस्मरण करणाऱ्याला संसारातील उपाधी बाधत नाहीत.

तुला सांगतो गूज हे बीज मंत्रु ।
जेणे नीरसे थोर संसार शत्रु ।
नव्हे मिथ्य हें बोलणें सत्य वाचा ।
जपे अंतरी मंत्र तेराक्षराचा ॥