मनाचे श्लोक - श्लोक ७१

प्रकाशन: संपादक मंडळ | ९ एप्रिल २००८

मनाचे श्लोक - श्लोक ७१ | Manache Shlok - Shlok 71

मनाचे श्लोक - श्लोक ७१ - [Manache Shlok - Shlok 71] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ७१


जयाचेनि नामें महादोष जाती ।
जयाचेनि नामें गती पाविजेती ॥
जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७१॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


अंघ याति यन्नमसंकीर्तनेन ।
नरःसद्रतिं याति यत्कीर्तनेन ॥
भवेत्पुण्यबृद्धिश्र्च यत्कीर्तनेन ।
प्रभाते हृदा राघवश्र्चिंतनीय ॥७१॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून अतिशय महत्त्वाचा बोध करवून देत आहेत. ते म्हणतात,

नाम स्मरे निरंतर ।
ते जाणावें पुण्यशरीर ।
माहा दोषांचे गिरिवर ।
रामनामें नासती ॥

नामें विषबाधा हरती ।
नामें चेडे चेटकें नासती ।
नामें होये उत्तम गती ।
अंतकाळी ॥

सहस्त्रा नामामधे कोणी येक ।
म्हणतां होतसे सार्थक ।
नाम स्मरतां पुण्यश्लोक ।
होइजे स्वयें ॥