मनाचे श्लोक - श्लोक ६९

प्रकाशन: संपादक मंडळ | ७ एप्रिल २००८

मनाचे श्लोक - श्लोक ६९ | Manache Shlok - Shlok 69

मनाचे श्लोक - श्लोक ६९ - [Manache Shlok - Shlok 69] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ६९


सुखानंदकारी निवारी भयातें ।
जनीं भक्तिभावे भजावे तयातें ॥
विवेके त्यजावा अनाचार हेवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥६९॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


सुखानंदकृद्वदारको यो भयस्य ।
स हि प्रीतियोगेन सेव्यो जगत्याम्‌ ॥
विचारादनाचारबुद्धिं विसृज्स ।
प्रभाते हृदा राघवश्र्चिंतनीयः ॥६९॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात,

सांगतसे खूण माझे अंतरीची ।
सर्व ही सुखाची सुखमूर्ती ।
सुखमूर्ती राम ।
सोडूं नको कदा ।
तुज तो आपदा लोगों नेदी ॥

श्रीरामाची कृपा झाली की देहावरचे प्रेम उडते. देहबुद्धी आहे म्हणून भीती आहे, ती देहबुद्धी नष्ट झाल्यावर भय कसे उरणार ?

भय वाटे देही तुं तव विदेही ।
देह्यातीत पाही आपणासी ॥