मनाचे श्लोक - श्लोक ६८

प्रकाशन: संपादक मंडळ | ७ एप्रिल २००८

मनाचे श्लोक - श्लोक ६८ | Manache Shlok - Shlok 68

मनाचे श्लोक - श्लोक ६८ - [Manache Shlok - Shlok 68] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ६८


बळें आगळा राम कोदंडधारी ।
महाकाळ विक्राळ तोही थरारी ॥
पुढे मानवा किंकरा कोण केवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥६८॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


बलेनाधकश्र्चारुकोदंडपाणि - ।
र्महानेष कालोऽपि यस्माद्विभेति ॥
कथा कैव मर्त्यस्य रंकस्य तत्र ।
प्रभाते हृदा राघवश्र्चिंतनीयः ॥६८॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


बळाने आगळा म्हणजे बळाने विशेष, कोदंडधारी म्हणजे धनुर्धारी. श्रीसमर्थ या श्लोकात सांगत आहेत की, बळाने विशेष आणि धनुष्य धारण केलेल्या श्रीरामाला पाहून महाभयंकर असा यम देखील थरथर कापतो, तेथे दुर्बळ अशा मनुष्याचा पाड तो किती !

हरीहर ब्रह्मादिक ।
हे जयाचे आज्ञाधारक ।
तूं येक मानवी रंक ।
भजेसिना तरी काय गेलें ॥

तरी असे न करता मुमुक्षूने श्रीरघुनाथभजनी लागावे.