मनाचे श्लोक - श्लोक ६६

प्रकाशन: संपादक मंडळ | ५ एप्रिल २००८

मनाचे श्लोक - श्लोक ६६ | Manache Shlok - Shlok 66

मनाचे श्लोक - श्लोक ६६ - [Manache Shlok - Shlok 66] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ६६


नव्हे सार संसार हा घोर आहे ।
मना सज्जना सत्य शोधुनि पाहे ॥
जनीं वीष खातां पुढे सूख कैचे ।
करीं रे मना ध्यान या राघवाचें ॥६६॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


प्रपंचे न सारं किमप्यस्ति नूनं ।
कुरु त्वं मनो निश्र्चयं सर्वथैवम्‌ ॥
विषं भक्षितं चेत्सुखं नैव किंचि ।
दतो रामचंद्रं सदा चिंतय त्वम्‌ ॥६६॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात,

संसार म्हणिजे सवें च स्वार ।
नाहीं मरणास उधार ।
मापीं लागलें शरीर ।
घडीनें घडी ॥

संसार म्हणिजे माहा पूर ।
माजी जळचरें अपार ।
डंखूं धावती विखार ।
काळसर्प ॥

असा हा संसार असार आणि घोर आहे. त्यात सुख मानणारा महामूर्ख होय.

परम मूर्खांमाजी मूर्ख ।
जो संसारी मानी सुख ।
या संसारदुःखा ऐसें दुःख ।
आणीक नाही ॥

संसार नुसता विषतुल्या आहे, तेव्हा त्या विषाचे सेवन करीत असता सुख कोठून येणार ?

यासाठी, हे मना, तू संसारचिंता सोडून देऊन श्रीरामाचे ध्यान कर, म्हणजे तुला परम्सुखाची प्राप्ती होईल.

संसारीचें दुख मज वाटे सुख ।
राघवाचें मुख पाहातां चि ॥