मनाचे श्लोक - श्लोक ६५

प्रकाशन: संपादक मंडळ | ४ एप्रिल २००८

मनाचे श्लोक - श्लोक ६५ | Manache Shlok - Shlok 65

मनाचे श्लोक - श्लोक ६५ - [Manache Shlok - Shlok 65] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ६५


नको दैन्यवाणें जिणे भक्तिऊणे ।
अती मुर्ख त्या सर्वदा दु:ख दूणे ॥
धरीं रे मना आदरें प्रीति रामी ।
नको वासना हेमधामीं विरामीं ॥६५॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


अभक्तया हरौ जीवितं मास्तु दैन्यं ।
भवेच्चातिमौढ्ये सदा दुःखदुःखम्‌ ॥
मनो रामचंद्रेऽर्पय प्रीतियोगं ।
कदाऽप्यस्तु मा वासना हेन्मि धान्मि ॥६५॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


तेव्हा, हे देवा, असले भक्तिहीन दैन्यवाणे जिणे मला देऊ नकोस. माझी वासना विषयांच्या ठिकाणी अनावर होऊ देऊ नकोस.

पण जो मूर्ख आहे, त्याला जरी ठाऊक असले की, संसार हा दुःखमूळ आहे, विषय हे दुःखालाच कारण होणार आहेत, तरी पण त्याच संसारापासून व विषयांपासून तो सुखाची अपेक्षा करत असतो. याचा परिणाम असा होतो की, त्याला सुख तर होत नाहीच, पण दुःख मात्र दुप्पट होते.
होईजेतें कष्टी तें चि कां धरावें । वेगी उधरावें आपणासी ॥

तेव्हा हे मना, ज्यापासून दुःख होणे निश्चित आहे ते विषयचिंतन कायमचे सोडून दे. हे मना, हेम, धाम, विराम इत्यादि पदार्थांवरील आसक्ती सोडून अनन्यभावाने श्रीरामाच्या ठिकाणी रत हो, म्हणजे श्रीरामाची तुला सहज भेट होईल. एरवी नाही. ५९ व्या श्लोकात मागे सांगितलेच आहे की,
मनीं कामना राम नाहीं जयाला ।
अती आदरें प्रीति नाहीं तयाला ॥