मनाचे श्लोक - श्लोक ६३

प्रकाशन: संपादक मंडळ | २ एप्रिल २००८

मनाचे श्लोक - श्लोक ६३ | Manache Shlok - Shlok 63

मनाचे श्लोक - श्लोक ६३ - [Manache Shlok - Shlok 63] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ६३


घरी कामधेनू पुढें ताक मागें ।
हरीबोध सांडोनि वेवाद लागे ॥
करी सार चिंतामणी काचखंडे ।
तया मागतां देत आहे उदंडे ॥६३॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


सधेनुंर्यथा याचते तक्रमज्ञ ।
स्तथाऽन्यां गिरं वक्ति रामे स्थितेऽपि ॥
प्रदत्वा मणिं याचते काचखंडं ।
न तस्मै विमूर्खाय कस्तत्प्रदद्या ॥६३॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून आपल्या सर्वांना सांगू इच्छितात की, आपल्या घरी कामधेनु असून सुद्धा आपण मात्र ताक मिळण्याचीच भीक मागत आहोत. श्रीहरीचे अखंड स्मरण करण्या ऐवजी आपण निष्फळ वादविवाद करण्यातच वेळ वाया घालवीत आहोत. आपल्याकडे चिंतामणी असूनही आपण तुटलेल्या काचेचे तुकडेच गोळा करण्यात धन्यता मानतो.

आराध्य देव अति समर्थ । वरी भक्ताचा दृढ भावार्थ । तरी तें भक्तिप्रेम व्यर्थ । होईल कां हो ॥ १ ॥
ऐसा सद्गुरु समर्थ असतां । सेवकें कां धरावी दीनता । समर्थसेवका वक्र पहातां । उरी कैसी कोणासी ॥ २ ॥
कामधेनु असतां द्वारी । तक्र मागणें घरोघरी । तेणें पढतमूर्खता पदरीं । येऊं पाहे ॥ ३ ॥
अथवा चिंतामणी असे करीं । तया मागे काचखंडे परी । तो जन्मदरिद्री भिकारी । भोगूं नेणें सर्वथा ॥ ४ ॥
तेवी श्रीसद्गुरुभक्त । करूं लागतां वादवेवाद । तेणे शुद्ध ज्ञानाचा पथ । चुकोनि गेला ॥ ५ ॥
तस्मात् वादवेवाद सोडावा । सुखसंवाद सर्वथा करावा । ब्रह्मगोळ अवघा भरावा । श्रीरामदास्यें ॥ ६ ॥
श्रीरामांच्या दासाचे दास । त्यांचे जे जे अनुदास । तयांना किंकर होय उदास । महद्भाग्यें ॥ ७ ॥