मनाचे श्लोक - श्लोक ६२

प्रकाशन: संपादक मंडळ | १ एप्रिल २००८

मनाचे श्लोक - श्लोक ६२ | Manache Shlok - Shlok 62

मनाचे श्लोक - श्लोक ६२ - [Manache Shlok - Shlok 62] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ६२


निजध्यास तो सर्व तुटोनि गेला ।
बळें अंतरीं शोक संताप ठेला ॥
सुखानंद आनंद भेदें बुडाला ।
मना निश्चयो सर्व खेदे उडाला ॥६२॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


विचार: क्षणादात्मनो याति चित्ता ।
द्वलात्क्रोध आगत्य वासं करोति ॥
प्रयात्यात्मसंवेदनानंद आशु ।
ततो याति दैन सन्निश्र्चयोऽपि ॥६२॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून आपल्याला सांगत आहेत की, आपण आपल्या खऱ्या ध्येयापासून तुटून गेलो आहोत. अशामुळे आपल्या अंतःकरणात शोक आणि संतापच बळावलेले दिसतात. बाहेरील दृष्य जगतापासून निर्माण होणारे सुख आणि मूळचा शाश्वत आनंद यातील महत्त्वाचा फरक आपण सर्व विसरलेलो आहोत. या सगळ्या कारणांमुळे मनात इतका खेद निर्माण झालाय की दृढ निश्चय करण्याचे बळ देखील आता आपल्यात उरलेले नाही.

अभिमानें वाद वाढवावा । तरी आत्मघात करावा । मनीं द्वैतभाव उपजावा । दुःखमूळ ॥ १ ॥
अभिमाने उठे मत्सर । मत्सरें ये तिरस्कार । पुढें क्रोधाचा विकार । प्रबळें बळें ॥ २ ॥
एवं षड्रिपु बळावती । मन पावे अधोगती । तेणें उपासना विस्मृती । सहज चि होये ॥ ३ ॥
उपासनाविस्मृतियोगें । मनी संशय उपजों लागे । क्षणक्षणीं विक्षोभें मन भंगे । साधकाचें ॥ ४ ॥
या सर्व पतनाचें मूळ । जनीं वाचाळता केवळ । तरी तो कासया व्हावा निर्फळ । वादवेवाद ॥ ५ ॥
श्रीगुरुचरणीं पूर्ण निष्ठा । ठेवोनि राही भक्तश्रेष्ठा । तेणें तुझी कामना इष्टा । पूर्ण होवे ॥ ६ ॥