Download MarathiMati.com's New Android App from Google Play

मनाचे श्लोक - श्लोक ६१

प्रकाशन: संपादक मंडळ | ३१ मार्च २००८

मनाचे श्लोक - श्लोक ६१ | Manache Shlok - Shlok 61

मनाचे श्लोक - श्लोक ६१ - [Manache Shlok - Shlok 61] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ६१


उभा कल्पवृक्षातळीं दु:ख वाहे ।
तया अंतरीं सर्वदा तेचि आहे ॥
जनी सज्जनी वाद हा वाढवावा ।
पुढें मागता शोक जीवीं धरावा ॥६१॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


समाश्रित्य कल्पद्रु मं शोकभाग्यः ।
सदा तस्य चित्ते वसत्येव दुःखम्‌ ॥
सम सज्जनैर्यो विवादं करोति ।
ततो याति संतापमंतर्महांतम्‌ ॥६१॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून आपल्याला समजवून सांगत आहेत की, कल्पतरुच्या खाली उभे राहूनही आपण दुःखीच आहोत. परमात्मा श्रीराम आपल्या हृदयात निवास करत आहे, याचा अनुभव आपण घेतला पाहिजे.

‘परमात्मा श्रीराम सर्वत्र आहे’ हा संदेश आपण सर्व जनां मध्ये पसरवलाच पाहिजे. तसे न केल्यास भविष्यात या गोष्टीचे आपल्याला खूप दुःख होईल.

श्रीराम सखा असतां शिरीं । जो बुडे चिंतासागरीं । तेणें कल्पवृक्षातळीं । रुदन आरंभिलें ॥ १ ॥
समर्थ असतां पाठीराखा । चिंता किमर्थ करणें मूर्खा । नेणोनिया सत्संगसुखा । वृथा कां भ्रमसी ॥ २ ॥
आपुलाल्या दैवताचा । अभिमान घेती जन साचा । तेणें अनंत जगदीशाचा । विसर पडे ॥ ३ ॥
मतामतांचा गलबला । कोणी पुसेना कोणाला । जो जे मतीं सांपडला । तयास तें चि थोर ॥ ४ ॥
ऐसें जाणोनिया जीवें । जनी वाद करणें त्यागावें । नाहीं तरी लागेल शिणावें । वेर्थ बापा ॥ ५ ॥
स्थितप्रज्ञ होवोनिया । श्रीराम कर्ता जाणोनिया । शोक कारी वाद वाया । कासया करावावा ॥ ६ ॥

Download MarathiMati.com's New Android App from Google Play