मनाचे श्लोक - श्लोक ६०

प्रकाशन: संपादक मंडळ | ३० मार्च २००८

मनाचे श्लोक - श्लोक ६० | Manache Shlok - Shlok 60

मनाचे श्लोक - श्लोक ६० - [Manache Shlok - Shlok 60] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ६०


मना राम कल्पतरु कामधेनु ।
निधी सार चिंतामणी काय वानूं ॥
जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता ।
तया साम्यता कायसी कोण आतां ॥६०॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो रामचंद्रो निधिः कामदोग्न्धी ।
सुरद्रुर्मणिश्र्चिंतितार्थप्रदश्र्च ॥
जडं याति यत्संगतश्र्चेतनत्वं ।
न तत्तुल्यतामेति कश्र्चिज्जगत्याम्‌ ॥६०॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून आपल्याला सांगू इच्छितात की, प्रभु श्रीरामचंद्र आपल्या सर्व कामना पूर्ण करणारा कल्पतरु आहे व कामधेनूही आहे. त्याचे अखंड स्मरण केल्यास तो आपल्याला सर्व दुःखातून मुक्त करतो.

श्रीराम सत्याचे प्रतीक आहे. श्रीराम परमात्म-स्वरूप असल्याकारणाने सर्व काही त्याच्याच सत्तेने चालते. त्यामुळे श्रीरामाची तुलना कोणाशीही करता येणार नाही.

श्रीराम माझा कल्पतरु । अथवा कामधेनु महुरु । इच्छाप्रदानीं आदरु । अत्यंत ज्यातें ॥ १ ॥
अथवा कुबेराचे नव निधी । चिंतामणी दे समृद्धी । तेवी सद्गुरु उदारधी । कोड पुरवी परोपरी ॥ २ ॥
परी हे ही दृष्टान्त । केवी श्रीरामी शोभत । दृष्टान्तवस्तूंसी वस्तुत्व । ज्याचिया सामर्थ्ये ॥ ३ ॥
कामधेनु कल्पतरु । निधी चिंतामणी सारु । रामसत्तामात्रें थोरु । असतां परी ॥ ४ ॥
कैसी रामी बरोबरी । करितीं बापुडीं भिकारीं । रामसत्ता अनुपम्य खरी । भुवनत्रयी ॥ ५ ॥
तस्तात् शरण जावें श्रीरामाला । सकल मुनिजनविश्रामाला । देवबंदविमोचकाला । अनन्य भावे ॥ ६ ॥
देवावेगळें कोणी नाही । ऐसें बोलती सर्व हि । परंतु त्यांची निष्ठा कांही । तैसी च नसे ॥ ७ ॥
ह्मणोनि ऐसें न करावें । सख्य तरी खरें चि करावें । अंतरीं सदृढ धरावें परमेश्वरासी ॥ ८ ॥