MarathiMati.com - Android App on Google Play Store

मनाचे श्लोक - श्लोक ६

प्रकाशन: संपादक मंडळ | ६ फेब्रुवारी २००८

मनाचे श्लोक - श्लोक ६ | Manache Shlok - Shlok 6

मनाचे श्लोक - श्लोक ६ - नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी.

श्लोक ६


नको रे मना क्रोध हा खेदकारी ।
नको रे मना काम नाना विकारी ॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू ।
नको रे मना मत्सरु दंभ भारु ॥६॥समर्थ रामदास स्वामी

संस्कृत रुपांतर


मनो मास्तु ते क्लेशद: क्रोधलेशो ।
मनो मास्तु कामो विकारस्य मूलम्‌ ॥
मनो नो मदं दुष्टमंगीकुरु त्वम्‌ ।
मनो मास्तु ते मत्सरो मा च दंभ: ॥६॥समर्थ रामदास स्वामी

अर्थ


क्रोध हा खेद संपादी । जेथें तेथें चहुंकडे । विवेक पाहतां कैचा । शुधी तेथें असेचिना ॥

या कामाच्या योगाने, रुपहानी शक्तिहानी । द्रव्यहानी परोपरीं । याती हानी कुळहानी । सर्व हानीच होत असे ॥

भारी, मोठा, षड्रिपूंत दंभ हा मोठा शत्रु आहे. श्रीसमर्थांनी वर्णिलेल्या षड्रिपूंपैकी काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ या पाचांचाच उल्लेख या श्लोकात आहे. श्रीसमर्थांचे “षड्रिपू” प्रकरण प्रत्येकाने आत्मशुद्धीचा हेतु धरुन एकवार तरी वाचावे.

MarathiMati.com - Android App on Google Play Store