मनाचे श्लोक - श्लोक ५७

प्रकाशन: संपादक मंडळ | २७ मार्च २००८

मनाचे श्लोक - श्लोक ५७ | Manache Shlok - Shlok 57

मनाचे श्लोक - श्लोक ५७ - [Manache Shlok - Shlok 57] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ५७


जगीं होइजे धन्य या रामनामे ।
क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमे ॥
उदासीनता तत्त्वता सार आहे ।
सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥५७॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


जनो धन्यतामेत्यजस्त्रं जगत्याम्‌ ।
हरेर्नामसंकीर्तनोपासनाभ्याम्‌ ॥
उदासीनता या पदार्थेषु सारम्‌ ।
तथा सर्वथा चित्तवृत्तेः प्रशांति ॥५७॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीराम नामस्मरणाचा महिमा कळण्यासाठी श्रीश्रेष्ठांचा ‘भक्तिरहस्य’ ग्रंथ अवश्य वाचावा.

श्रीराम जय राम जय जय राम ।
अखंड जो स्मरे सप्रेम ।
तो स्वयें चि असे पुरुषोत्तम ।
म्हणौनि राम न विसरावा ॥

नित्य नियमासंबंधाने श्रीसमर्थांचा “अंतर्भाव” हा ग्रंथ अवश्य वाचावा.

मानसपूजा जप ध्यान ।
येकाग्र करूनियां मन ।
त्रिकाळ घ्यावें दर्शन ।
मरूत्सुताचें ॥

वैराग्य, नैराश्य, उदासीनता सत्वगुणाचे लक्षण असून तीच नरजन्माची सफलता आहे. या असार संसारात सार काय ती उदासीनता आहे. या उदासीनतेमुळे सदासर्वदा वृत्ती मोकळी राहते, म्हणजे अलिप्त स्थिती प्राप्त होते. अखंड श्रीराम नामस्मरण व श्रीसद्गुरूंची पूजा, ध्यान, जप, श्रवण, मनन इत्यादि जो नित्य नियम घालून दिलेला असेल त्याचे प्रतिपालन करीत असता कसल्याही फलाची अपेक्षा न करता निरंतर निरुपाधिक स्थितीत रहावे, असा भावार्थ.