Download MarathiMati.com's New Android App from Google Play

मनाचे श्लोक - श्लोक ५६

प्रकाशन: संपादक मंडळ | २६ मार्च २००८

मनाचे श्लोक - श्लोक ५६ | Manache Shlok - Shlok 56

मनाचे श्लोक - श्लोक ५६ - [Manache Shlok - Shlok 56] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ५६


दिनाचा दयाळू मनाचा मवाळू ।
स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू ॥
तया अंतरी क्रोध संताप कैंचा ।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५६॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


दयालुः कृपालुः सदा दीनवर्गे ।
समस्तेषु लोकेषु यः स्नेहयुक्तः ॥
मनो यस्य न क्रोधसंतापयुक्तम्‌ ।
स धन्योऽस्ति दासो हि सर्वोत्तमस्य ॥५६॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात,

रामदास दासा ।
सांभाळितो कैसा ।
जीव प्राण जैसा ।
तैसा पाहे ॥

जेथे नाहीं दुसरी परीं ।
क्रोध यावा कोणावरी ।
क्रोधरहित सचराचरीं ।
साधु जन वर्तती ॥

श्रीसमर्थ आपल्याला सांगत आहेत की, जो सर्वोत्तमाचा दास आहे, तो नेहमी दीनांकडे दयाळूपणे बघतो आणि तो मनाने प्रचंड मवाळ असतो. त्याच्या अंतर्बाह्य सर्वांप्रती प्रेमभाव ओतप्रोत भरलेले असते. तो सर्वांना समान लेखतो आणि रामचिंतनात स्थिरावल्यामुळे त्या अविचल शांत अवस्थेत तो कधीही कोणावरही क्रोधित होत नाही.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play