पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

मनाचे श्लोक - श्लोक ५५

प्रकाशन: संपादक मंडळ | २५ मार्च २००८

मनाचे श्लोक - श्लोक ५५ | Manache Shlok - Shlok 55

मनाचे श्लोक - श्लोक ५५ - [Manache Shlok - Shlok 55] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ५५


नसे मानसीं नष्ट आशा दुराशा ।
वसे अंतरीं प्रेमपाशा पिपाशा ॥
ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५५॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


दुराशा गता यस्य चित्तासमूला ।
प्रवृद्धा हरेर्भावनेतीव तृष्णा ॥
ऋणी देवदेवः कृतो येन भक्त्या ।
स धन्योऽस्ति दासो हि सर्वोत्तमस्य ॥५५॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून सांगत आहेत की, नष्ट आशा म्हणजे दुष्ट आशा, दुराशा, स्वार्थाची आशा.

“आ” खोडून समासात “पा” केला आहे. प्रेमबद्ध पिपासा म्हणजे तृष्णा. भगवत्प्रेमाची ज्याला तहान लागली आहे.

माझें सर्व जावें ।
देवाचें राहावें ।
देवासी पाहावें भक्तपणें ॥

अशा भक्तिभावाने ज्याने आपलासा केला.

भगवंत भावाचा भुकेला ।
भावार्थ देखोन भुलला ।
संकटी पावें भाविकाला रक्षितसे ॥

Book Home in Konkan