मनाचे श्लोक - श्लोक ५३

प्रकाशन: संपादक मंडळ | २३ मार्च २००८

मनाचे श्लोक - श्लोक ५३ | Manache Shlok - Shlok 53

मनाचे श्लोक - श्लोक ५३ - [Manache Shlok - Shlok 53] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ५३


सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं ।
सदा सर्वदा सत्यवादी विवेकी ॥
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५३॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


सदैवार्जवी सर्वलोकप्रियो यो ।
विचारे रतोऽसत्सतोः सत्यवादी ।
वचो वक्ति नो नोऽमृतं नो कदाचित्‌ ।
स धन्योऽस्ति दासो हि सर्वोत्तमस्य ॥५३॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ सत्वगुणांचे एक लक्षण सांगताना दासबोधात म्हणतात -

सकळ जनासी आर्जव ॥
जेथें तेथें नित्य नवा ।
जनासी वाटे हा असावा ॥

जो विवेकाची ज्योत सतत तेवत ठेवतो व जो तीनदा नाही, एकदाच निश्चयाची भाषा बोलतो, तो सर्वोत्तमाचा दास असून जगात सर्वाधिक धन्य आहे.