मनाचे श्लोक - श्लोक ५२

प्रकाशन: संपादक मंडळ | २२ मार्च २००८

मनाचे श्लोक - श्लोक ५२ | Manache Shlok - Shlok 52

मनाचे श्लोक - श्लोक ५२ - [Manache Shlok - Shlok 52] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ५२


क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे ।
न लिंपे कदा दंभ वादे विवादे ॥
करी सुखसंवाद जो उगमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५२॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


करोत्यायुषो यो व्ययं ब्रह्मनिष्ठः ।
प्रलिप्तो न दोषेण दंभादिकेन ॥
करोत्युत्तमैः प्रत्यहं ब्रह्मवादम्‌ ।
स धन्योऽस्ति दासो हि सर्वोत्तमस्य ॥५२॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, ‘तत्त्वमसि’ या महावाक्याचे आपल्या मनाशी चिंतन जनात अनुवाद करून

पुढे भोजन जालियांवरी ।
कांही वाची चर्चा करी ।
येकांती जाऊन विवरी ।
नाना ग्रंथ ॥ दा.११-१३-२२

साधु स्वरूप स्वयंभ ।
तेथे कैंचा असेल दंभ ।
जेथे द्वैताचा आरंभ ।
जाला च नाहीं ॥

आपुला आपण स्वानंद ।
कोणावरी करावा मद ।
याकारणें वादविवाद ।
तुटोन गेला ॥

चंचळ नदी गुप्त गंगा ।

अशी जी माया तिच्या उगमाचा.

येक बळाचे निवडले ।
ते पोहत चि उगमास गेले ।
उगमदर्शनें पवित्र जाले ।
तीर्थरूप ॥