मनाचे श्लोक - श्लोक ५१

प्रकाशन: संपादक मंडळ | २१ मार्च २००८

मनाचे श्लोक - श्लोक ५१ | Manache Shlok - Shlok 51

मनाचे श्लोक - श्लोक ५१ - [Manache Shlok - Shlok 51] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ५१


मदें मत्सरें सांडिली स्वार्थबुद्धी ।
प्रपंचीक नाहीं जयातें उपाधी ॥
सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५१॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मदो मत्सरो येन बुद्धया निरस्तः ।
प्रपंचोद्धवो यस्य चित्ते न खेदः ॥
सदा वक्ति यः सूतृतामेव वाचम्‌ ।
स धन्योऽस्ति दासो हि सर्वोत्तमस्य ॥५१॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ दासबोधात म्हणतात -

आपुला आपण स्वानंद ।
कोणावरी करावा मद ॥

आपला आपण मत्सर ।
कोणावरी करावा ॥

मद, मत्सर, स्वार्थबुद्धी किंवा लोभ यांनी ज्याला सोडला आहे तो.

जेणे दृष्य केले विसंच ।
तयास कैचा हो प्रपंच ।
याकारणें निःप्रपंच ।
साधु जाणावा ॥

मृदपणें जैसें गगन ।
तैसें साधूचें लक्षण ।
याकारणें साधुवचन ।
कठीण नाही ॥