मनाचे श्लोक - श्लोक ५०

प्रकाशन: संपादक मंडळ | २० मार्च २००८

मनाचे श्लोक - श्लोक ५० | Manache Shlok - Shlok 50

मनाचे श्लोक - श्लोक ५० - [Manache Shlok - Shlok 50] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ५०


नसे अंतरी काम नानाविकारी ।
उदासीन जो तापसी ब्रह्मचारी ॥
निवाला मनीं लेश नाही तमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५०॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


विकारा न कामादयो यस्य चित्ते ।
तपस्वी विरागी स्वयं ब्रह्मचारी ॥
तमोलेशहीनोऽमनस्कः सदा यः ।
स धन्योऽस्ति दासो हि सर्वोत्तमस्य ॥५०॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


काम उत्पन्न करणारा. ज्याच्या अंतःकरणात काम किंवा इतर विकार नसतो, किंवा ज्याची वृत्ति कामकार नसते. श्रीसमर्थ दासबोधात म्हणतात -

स्वरूपीं भरतां कल्पना ।
तेथें कैंची उरेल कामना ।
म्हणौनियां साधु जना ।
काम चि नाहीं ॥

विषयावरील ज्याचे प्रेम गेले आहे असा वीतरागी, आसारहित, निराश. दासबोधात म्हटलंय -

आशा धरितां परमार्थाची ।
दुराशा तुटली स्वर्थाची ।
म्हणोन नैराशता साधूची ।
वोळखण ॥

जो निःसंदेह झाला, तम म्हणजे अज्ञान समूळ नाहीसे होऊन संशयरहित ज्ञानाने ज्याचे समाधान झाले.