मनाचे श्लोक - श्लोक ४९

प्रकाशन: संपादक मंडळ | १९ मार्च २००८

मनाचे श्लोक - श्लोक ४९ | Manache Shlok - Shlok 49

मनाचे श्लोक - श्लोक ४९ - [Manache Shlok - Shlok 49] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ४९


सदा बोलण्यासारिखे चालताहे ।
अनेकीं सदा एक देवासि पाहे ॥
सगूणी भजे लेश नाही भ्रमाचा ।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥४९॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


सदा वक्त्ति यो याति मार्गण तेन ।
प्रपश्चत्यनेकेषु यो देवमेकम् ॥
भ्रमस्य क्षयाद्यो भजेद्वासुदेवम् ।
स धन्योऽस्ति दासो हि सर्वोत्तमस्य ॥४९॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थांनी हा उपदेश दासबोधात व इतरत्र अनेक ठिकाणी केलेला आहे. महंतांच्या ठिकाणी जो गुण असायला पाहिजे त्यात हा श्रेष्ठ गुणांपैकी एक आहे. दासबोधात समर्थ सांगतात -

जैसे बोलणें बोलावें ।
तैसें चि चालणें चालावे ।
मग मंहतलीळा स्वभावें ।
आंगी बाणे ॥

देव सदोदित संचला ।
लोकीं बहुविध केला ।
परंतु बहुविध जाला ।
हें तों घडेना ॥

तो येकला चि सकळां घटीं ।
करी भिन्नभिन्न राहाटी ।
सकळ सृष्टीची गोष्टी ।
किती म्हणौन सांगावी ॥

इतुके ठाईं पुरवला ।
अनेकीं येक चि वर्तला ॥

सांडील सगुण भजनासी ।
तरी तो ज्ञाता परी अपेसी ।
म्हणोनि यां सगुणभजनासी ।
सांडू च नये ॥

निर्गुण ब्रह्मावेगळें अघवें ।
भ्रमरूप ॥