मनाचे श्लोक - श्लोक ४८

प्रकाशन: संपादक मंडळ | १८ मार्च २००८

मनाचे श्लोक - श्लोक ४८ | Manache Shlok - Shlok 48

मनाचे श्लोक - श्लोक ४८ - [Manache Shlok - Shlok 48] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ४८


सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा ।
सदा रामनामें वदे नित्य साचा ॥
स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा ।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥४८॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


सदा देवकार्ये श्रमो यस्य देहे ।
सदा यस्य वाग्विक्त्ति सद्रामनाम ॥
वरिष्ठे स्वधर्मे स्थितिर्यस्य नित्यं ।
स धन्योऽस्ति दासो हि सर्वोत्तमस्य ॥४८॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की, नवविधा भक्तिमध्ये जी सातवी भक्ति आहे, दास्य, ती ज्याला नेहमी घडते.

तिसरी भक्ती जी नामस्मरण, ती जो नेहमी करतो.

वर्णाश्रमधर्माने किंवा दासबोधात सांगितल्या प्रमाणे
सकाळ धर्मामध्यें धर्म ।
स्वरूपी राहाणे हा स्वधर्म ॥

त्या स्वधर्माने.

देवाचे किंवा सद्गुरूंचे दास्यत्व करणे हे भूषण होय.