मनाचे श्लोक - श्लोक ४६

प्रकाशन: संपादक मंडळ | १६ मार्च २००८

मनाचे श्लोक - श्लोक ४६ | Manache Shlok - Shlok 46

मनाचे श्लोक - श्लोक ४६ - [Manache Shlok - Shlok 46] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

श्लोक ४६


मना जे घडी राघवेवीण गेली ।
जनीं आपुली ते तुवां हानि केली ॥
रघूनायकावीण तो शीण आहे ।
जनी दक्ष तो लक्ष लावूनि पाहे ॥४६॥समर्थ रामदास स्वामी

संस्कृत रुपांतर


मनो या गता नाडिका रामहीना ।
तदायुस्त्वया नाशितं बुद्धिजाड्यात् ॥
श्रमो रामसेवा विना जीवितं य ।
त्स दक्षो मनुष्येषु यो रामसेवी ॥४६॥समर्थ रामदास स्वामी

अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून सांगत आहेत की, श्रीरामाच्या ऐवजी इतर अर्थहीन विषयांचे चिंतन घडले, म्हणजे तेवढा काळ फुकट गेला, व्यर्थ गेला, वाया गेला असे समजावे.

सांडून राम आनंदघन ।
ज्याचे मनीं विषयचिंतन ।
त्यासी कैचें समाधान ।
लोलंगतासी ॥

याविषयी समर्थ आपल्याला सावध रहायला सांगत आहेत.

विवेकी दक्ष जो कोण्ही ।
पुरुषार्थी धर्मरक्षकु ।
आमोल्य जन्म हा तेणे ।
वेर्थ चि दवडूं नये ।